अभिनेत्री श्रद्धा कपूर लव रंजन या चित्रपटाचे शूटिंग संपवून नुकतीच मुंबईला परतली आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत लव रंजनच्या शूटिंगसाठी श्रद्धा युरोपला गेली होती. मुंबईत परतताच श्रद्धा चर्चेत आली आहे. श्रद्धाने मुंबईत अनाथ मुलांना भूटवस्तू वाटल्या आहेत. श्रद्धाच्या या मदतीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. श्रद्धाची ही कृती तिच्या चाहत्यांना खूपच भावली आहे. चाहत्यांनी श्रद्धाचे फोटो शेअर करून तिचे कौतुक केले आहे. श्रद्धा कपूर नेहमीच गरजूंबद्दल दयाळूपणा आणि सहानुभूती दाखवत असते. जिम वर्कआउटमधून बाहेर येत असताना तेथील मुलांना श्रद्धाने काही वस्तूंचे वाटप केले आहे.