आमिर खानचा लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.



सोशल मीडियावर या सिनेमावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार टाकला जात आहे.



. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. या सर्व गोष्टींवर आता आमिरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.



बऱ्याच दिवसांपासून आमिरनं मोठ्या पडद्यावरुन ब्रेक घेतला होता. आता तो लाल सिंह चड्ढा चित्रपटामधून कम-बॅक करत आहे.



चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर बायकॉट 'लाल सिंह चड्ढा' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.



'काही लोकांना वाटतं की मला भारत देश आवडत नाही, या गोष्टीचं मला दु:ख होतं. पण मला हे सांगायचं आहे की ते पूर्णपणे चुकीचे आहे.' अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली आहे.



पुढे तो म्हणाला, 'मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये आणि कृपया थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा.'



लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.



आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी आमिरनं 50 कोटी रूपये मानधन घेतलं आहे.