महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी आपल्या खास शैलीने अनेकांचं प्रेम मिळवलंय त्यापैकीच एक म्हणजे सांगलीत राहणाऱ्या नलिनी जोशी. 99 वर्षांच्या या आजीबाईंची आदेश बांदेकर यांनी घरी जाऊन भेट घेतली गेली पाच सहा वर्ष नलिनी आजी आदेश बांदेकर यांना गाणी ऐकवतात. संध्याकाळी होम मिनिस्टर ही मालिका सुरु होणाच्या आधी त्या टीव्हीसमोर खुर्ची टाकून बसतात. सहा वाजता कार्यक्रम सुरु झाला की आदेश बांदेकर यांनी बघून रोज एक गाणं म्हणतात. आज या आजींनी वयाची 99 वर्ष पूर्ण करुन शंभराव्या वर्षात पदार्पण केलंय. याच निमित्ताने आदेश बांदेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या खास प्रसंगी आदेश बांदेकर यांनी आजीबाईंना पैठणी भेट दिली