चार्जिंगवेळी मोबाईल बॅटरीचा स्फोट, तरुणाची बोटं रक्तबंबाळ

Continues below advertisement
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुणाच्या हाताची तीन बोटे तुटली. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली इथं ही धक्कादायक घटना घडली.

सोमेश्वर तळेकर असं या 17 वर्षीय युवकाचं नाव आहे.

सोमेश्वर हा खेकडा चार्जरने (extra battery charger) मोबाईल बॅटरी चार्ज करत होता. मात्र त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की सोमेश्वरच्या हाताची तीन बोटे तुटली. इतकंच नाही तर त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान सोमेश्वरला मानवत येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्या बोटांची शस्त्रक्रिया केली आहे, त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram