Get back lost Phone | चोरीचा मोबाईल परत मिळणं सहज शक्य | ABP Majha
आता तुमचा चोरीला गेलेला फोन सहज परत मिळवता येणार आहे. कारण केंद्रीय दूरसंचार विभागानं देशातील सर्व मोबाईल फोन्सचा डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर असं नाव देण्यात आलं. यात मोबाईलचा IMEI नंबरही रजिस्टर करण्यात आला. त्यामुळे
फोनची चोरी झाल्यास पोलिसात कळवल्यानंतर तात्काळ य़ा डेटाबेसमधून हा फोन ब्लॉक केला जाईल, त्यानंतर या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क चालणार नाही. त्यामुळे पोलिसांनाही हरवलेला मोबाईल सहज शोधता येईल.