पुणे : पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

Continues below advertisement
पुण्यातील येरवड्यात पाण्याने भरलेल्या ख़ड्ड्यात बुडून 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या मातोश्री या इंग्रजी माध्यम शाळेच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना घडली काल दुपारी असून रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ अशी या मृत मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलांचं वय हे सहा ते सात वर्षे आहे. मातोश्री या शाळेचं बांधकाम सुरु आहे. तिथे वर्गखोल्या बांधण्यासाठी मोठे खड्डे खणून ठेवले आहेत. काल दुपारी ही दोन्ही मुलं शाळेच्या गेट खालून क्रिकेट खेळण्यासाठी शाळेत गेली. मात्र खड्ड्यात गेलेला बॉल काढण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram