नाशिक : येवल्यामध्ये कालव्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
Continues below advertisement
येवला तालुक्यात कालव्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला.. ज्यापैकी वडिलांचा आणि लहान मुलाचा मृतदेह हाती लागलाय..सोमनाथ गीते आणि त्यांची मुलं सत्यम आणि कार्तिक अशी त्यांची नावं आहेत.. काल रात्री महालखेडातल्या एक्सप्रेस कालव्यात औषध फवारणीला पाणी हवं असल्यानं सत्यम कालव्यात उतरला होता.. पाणी जास्त असल्यानं तो बुडू लागला यावेळी वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र त्यांचाही अंदाज चुकला.. अखेर या दोघांना वाचवण्यासाठी कार्तिकनंही पाण्यात उडी घेतली.. पण पाणी जास्त असल्यानं हे तिघेही बुडाले.. काल त्यांच्यासाठी शोधकार्य सुरु केलं होतं.. पाणी जास्त असल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं होतं जे आज सकाळी पुन्हा सुरु केलं
Continues below advertisement