यवतमाळ : निवडणूक कामावर बहिष्कार टाकणं शिक्षकांच्या अंगाशी

Continues below advertisement
निवडणूक कामकाजावर अशैक्षणिक काम म्हणून बहिष्कार टाकनं यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांना चांगलंच महागात पडलंय. एकून २७ शिक्षकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज्य निवडणूक आयोगामार्फत १५ नोव्हेंबर पासून राळेगाव मतदार संघातील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र, शिक्षकांनी या कामावर अशैक्षणिक काम म्हणून बहिष्कार घातला. वारंवार निर्देश देऊनही शिक्षकांनी पुनर्निरीक्षणाचे काम केलं नाही. त्यामुळे निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्याचं उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram