तिसऱ्या मजल्यावरुन लहानगा मित्राच्या अंगावर पडला आणि... | स्पेशल रिपोर्ट | यवतमाळ | एबीपी माझा
पाचवीत शिकणारा पुसदचा स्वप्नील झगरे... दिवाळीच्या सुट्टीत जमलेल्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणेच घरासमोर खेळत होता... तितक्यात त्याला उंच इमारतीवर अडकलेला पतंग दिसला... पतंग काढण्यासाठी स्वप्निल छतावर चढला...मात्र तो काढण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि स्वप्नील पतंगासह सर्व्हिसलाईनवर पडला... त्याच्या झटक्यानं तार तुटली आणि तो खाली कोसळला... खरा चमत्कार तेव्हा झाला...जेव्हा स्वप्नील जमिनीवर पडण्याऐवजी पतंग उचलायला आलेल्या मित्राच्या पाठीवर पडला...