यवतमाळ : गावात बिबट्याचं पिल्लू आढळलं, सेल्फीसाठी लगबग
यवतमाळमध्ये महागाव तालुक्यातील वाकन गावात एका शेतात बिबट्याचे पिल्लू आढळलं. आपल्या आईपासून हे पिल्लू भरकटलं असल्याचा अंदाज आहे.. संतोष राठोड यांच्या शेतात हे बिबट्याचं पिल्लू आढळलंय.... दरम्यान वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत... बिबट्याच्या पिल्लाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी शेतात गर्दी केली... मात्र या पिल्लासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची लगबग दिसली.