UNCUT | पांढरकवड्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण | यवतमाळ | एबीपी माझा
दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा कधी, कशी, केव्हा द्यायची, हे आता आपले जवान ठरवतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. विविध कामांच्या उद्घघाटनानिमित्त ते यवतमाळमधील पांढरकवड्यात बोलत होते. यावेळी मोदींनी लोकांना आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. शिवाय, दहशतवादी संघटनांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईलच असा पुनरुच्चारही नरेंद्र मोदींनी केला.