VIDEO | अ.भा. मराठी साहित्य संमेलन सुरु, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी बातचीत | यवतमाळ | एबीपी माझा
ग्रंथदिंडीने 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. साहित्य महामंडळातर्फे उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला देण्यात आला. वैशाली सुधाकर येडे असं त्यांचं नाव असून त्या राजूर गावच्या रहिवासी आहेत. दरम्यान ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांसह यवतमाळ जिल्ह्यातल्या मान्यवर मंडळी सहभागी झाले होती. त्यांच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी मानसी देशपांडेने.