VIDEO | साहित्य संमेलनातील बुक स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी गर्दी | यवतमाळ | एबीपी माझा
Continues below advertisement
यवतमाळमधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. ग.दी.माडगुळकरांच्या साहित्य संपदेचा आढावा घेणाऱ्या संगीतमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय वाटवे, गौरी देशपांडे, अपर्णा केळकर, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी सहभागी झाल्या होत्या. या चारही सहभागी कलाकारांनी काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला. दरम्यान, संमेलनात विविध प्रकाशकांच्या बूक स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी वाचनप्रिय लोकांनी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement