यवतमाळ | राजाभाऊ ठाकरे आणि डॉ. अशोक गिरींकडून अटलजींच्या आठवणींना उजाळा

देशाच्या राजकाराणातील महाऋषी, भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळी वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजातशत्रू, हळव्या मनाचा कवी, अभ्यासू पत्रकार, दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते. दुसरीकडे भूतानचे राजा वांगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीदेखील वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola