खेळ माझा : सांगलीत 18 जानेवारीला किरण भगतची लोखंडी पिंजऱ्यात मनजीतसिंगशी कुस्ती

Continues below advertisement
महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून १८ जानेवारीला सांगलीत पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होत आहे. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली निकाली कुस्ती या कार्यक्रमाचं आकर्षण ठरणार आहे. ही कुस्ती लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती. पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या सांगलीतल्या स्थापनेनिमित्तानं त्या परंपरेचं पुनरुज्जीवन होणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे आणि संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram