मुंबई : प्रफुल पटेल यांच्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन, दिग्गजांची हजेरी
Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला. उद्योगपती नमित सोनीसोबत हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला राजकारण्यांसह दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
लग्नानंतर वरळीतील एनएससीयामध्ये रिसेप्शनचं रात्री उशिरापर्यंत आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, अभिनेता शाहरुख खान, कतरिना कैफ, झहीर खान यांची यावेळी उपस्थिती होती.
Continues below advertisement