जगातल्या सर्वात वयस्कर पांडाचा चीनमध्ये मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगातील सर्वात वयस्कर पांडाचं निधन झालंय. चीनमधील प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या बासी या पांडाचा मृत्यू झाला आहे. फुझोऊ भागात असणाऱ्या रिसर्च अँड एक्सचेंज सेंटरमध्ये त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. ३७ वर्षांच्या या पांडाला श्रद्धांजली वाहताना अनेक जण भावूक झाले होते. इतकंच नाही तर त्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. बासी चीनमध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याला या प्राणीसंग्रहालयात एखाद्या सेलिब्रिटींसारखी वागणूक दिली जायची.