Karnataka political crisis | कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी स्वतः राजीनामा देण्याची शक्यता | बंगळुरु | ABP Majha
Continues below advertisement
तिकडे कर्नाटकातील राजकीय नाटकावर काही केल्या पडदा पडत नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी स्वतः राजीनामा देण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी यांनी आज सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात.
काल काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनीही राजीनामा दिलाय. डॉ. के सुधाकर आणि एमटीबी नागराज अशी या आमदारांची नावं आहेत. काँग्रेस आणि जेडीएसच्या मिळून आतापर्यंत 16 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. पण विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय अजून राखून ठेवलाय.
काल कुमारस्वामी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याशीही चर्चा केलीय.
काल मुंबईत असलेल्या डीके शिवकुमार यांची रात्री बंगळुरुला रवानही करण्यात आलीय.