'महाराष्ट्र केसरी'ची गदा पुन्हा अभिजीत कटके पटकावणार?| स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

अभिजीत कटके 'महाराष्ट्र केसरी'चा मानाचा किताब पुन्हा जिंकणार की, यंदा आपल्याला नवा 'महाराष्ट्र केसरी' पाहायला मिळणार, हाच सवाल सध्या महाराष्ट्रातल्या कुस्तीशौकिनांच्या मनात आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीत सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्तीला जालन्याच्या आझाद मैदानावर सुरुवात होत आहे. अभिजीत कटकेने गेल्या वर्षी किरण भगतला हरवून भूगावात महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीतची गेल्या वर्षभरातली कामगिरी लक्षात घेता, त्यालाच यंदा सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची पसंती देण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola