सुधीर ढवळे कोण आहेत?

Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना पुणे पोलिसांनी गोवंडीतील त्यांच्या ताब्यात घेतले आहे. आज सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सध्या गोवंडीमधील देवनार पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून, त्यांना पुढील कारवाईसाठी पुण्याला घेऊन जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडाझडती घेतली होती आणि आज त्यांना अटक करण्यात आली.

तसेच, वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

महेश राऊत यांनाही पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. राऊत हे  मूळचे गडचिरोलीतील आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे स्थायिक झालेले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram