मुंबई : व्हॉट्सअपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2018 03:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
व्हॉट्सअपवर तुम्ही एकाचवेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड़ करु शकणार नाहीत. बनावट यूझर्सचा वापर रोखण्यासाठी आणि अफवांचा होणारा प्रसार रोखण्यासाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यूझर्स आता क्विक फॉरवर्डचा ऑप्शनही वापरु शकत नाहीत, असा निर्णय व्हॉट्सअॅप कंपनीनं घेतला. देशात अफवांना ऊत आल्यानं हिंसक घटना वाढत होत्या त्यामुळे व्हॉट्सअॅपला योग्य उपाय करण्याची सूचना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिली होती.