मुंबई : व्हॉट्सअॅपद्वारेही यूजर्सना पैसे पाठवता येणार
Continues below advertisement
कॅशलेस व्यवहारांना आणखी बळ मिळण्याची चिन्हं आहेत. व्हॉट्स अॅपवरही लवकरच डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होईल. पुढील महिन्यात व्हॉट्सअॅप नवं पेमेंट फिचर सुरु करणार आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना पैसे पाठवणं अगदी सोपं होईल. युनिफाइड पेमेंट इंटरफेसवर आधारित ही पेमेंट सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक या बँकांच्या सहकार्याने सुरू होईल. यापैकीच एका बँकेसोबत सध्या या फिचरचे टेस्टिंग सुरू असून पुढील महिन्यापर्यंत हे फिचर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement