आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड करण्यापूर्वी तुमची परवानगी आवश्यक | एबीपी माझा

आता कुणीही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या कुठल्याही ग्रुपवर अॅड करु शकणार नाही. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं नवं फिचर बनवायला सांगितलं आहे. हे फिचर लवकरच भारतात लागू करण्यात येईल. या फिचरनुसार कुठल्याही ग्रुपवर अॅड करण्याआधी अॅडमिनला तुमची परवानगी घ्यावी लागेल.

सध्या व्हॉट्सअॅपच्या कुठल्याही ग्रुपवर तुम्हाला सहजरित्या अॅड करता येतं. मात्र, परवानगीविना अनेक ग्रुप्समध्ये अॅड केलं जात असल्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून मंत्रालयानं व्हॉट्सअॅपला तशा सूचना दिल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola