कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पाच दिवसात भाजपच्या दुसऱ्या कार्यकर्त्याची हत्या, तृणमूलवर ठपला
Continues below advertisement
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये... आज पुरुलिया गावामध्ये आणखी एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे... दुलाल कुमार असं या 32 वर्षीय मृत कार्यकर्त्याचं नाव आहे.
एका विजेच्या खांबाला हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला... दरम्यान ही हत्या असून यामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे..
याआधीही पुरुलियाच्या जंगलातच त्रिलोचन महातो नावाच्या 20 वर्षीय भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती... हत्येनंतर त्रिलोचनचा मृतदेह एका झाडाला टांगला होता...शिवाय भाजपसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची अशीच अवस्था होणार, अशा आशयाचं एक पत्रही त्रिलोचनच्या टीशर्टवर चिकटवण्यात आलं होतं... त्यामुळे दुलाल कुमारची हत्याही तृणमूल कार्यकर्त्यांनीच केली असावी, असा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगालमधल्या पंचायत निवडणुकीतल्या वैरानं आता रक्तरंजित टोक गाठल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
Continues below advertisement