कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात राजघराणी रस्त्यावर

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात विविध राज घराण्यातील मंडळी आज रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या सरदार आणि जहागीरदार घराण्यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं, त्याच घराण्यातील लोक रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळालं. महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याजवळ भगवा ध्वज फडकावून शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला. या आंदोलनात घोरपडे, चव्हाण, गायकवाड, शिंदे, खानविलकर यांच्यासह विविध राजघराण्यांतील मंडळीनी सहभाग नोंदवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola