स्पेशल रिपोर्ट : अकोला : निसर्गसौंदर्याने नटलेला अकोल्यातील नरनाळा किल्ला
मागच्या दहा दिवसांपासून पावसानं महाराष्ट्राला पार ओलंचिंब केलंय. हाच पाऊस सिलेब्रेट करण्यासाठी आपलं कुठे तरी जाण्याचं ठरलेलं असंतंय. यासाठी आम्ही तुम्हाला एक ठिकाण सुचवतोय... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातलं नरनाळा अभयारण्य.... स्रुष्टी-निसर्गासह इतिहासानंही अगदी मुक्तहस्तानं उधळण केलेला स्वर्ग म्हणजेच नरनाळा.... पावसातील याच नरनाळ्याची जंगल सफारी आम्ही आपल्याला आता घडवणार आहोत. अकोल्यातील 'माझा'चे प्रेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या कँमेर्यातून टिपलेला स्रुष्टीसौंदर्याचं सर्वांगसुंदर लेणं असलेला पावसातील हा धुंद नरनाळा पाहूयात.... चला, तर....