मुंबई : येत्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाचा अंदाज
Continues below advertisement
येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण भारतात दक्षिण छत्तीसगड ते कर्नाटक दरम्यान वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसंच कोकणच्या काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement