मुंबई : 5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पिकांची काळजी घेण्याचं आवाहन

Continues below advertisement
येत्या 5 ते 14 ऑक्टोबरपर्यंत बहुतांश महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा वर्तवला गेला आहे. त्यामुळे कापणीवर आलेल्या आणि कापणी झालेल्या शेतमालाची सुरक्षितपणे साठवणूक करा, असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे. 5 ते 14 ऑक्टोबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाजी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच जनावरांनाही झाडं, शेड यांच्या आसऱ्याला बांधू नये, असंही सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram