VIDEO | 2018 ठरलं भारतीय श्रीमंतांसाठी अच्छे दिनवालं वर्ष | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
२०१८ ठरलं भारतीय श्रीमंतांसाठी अच्छे दिनांचं वर्ष ठरलंय. गेल्या वर्षभरातील मालमत्ता वाढीचा ऑक्सफेम इंटरनॅशनलनं अभ्यास करुन एक अहवाल आज जारी केलाय. या अहवालानुसार कुणी कल्पनाही करू शकत अशा भन्नाट वेगानं भारतीय श्रीमंतांची मालमत्ता वाढलीय. दर तासाला ९१ कोटी ६६ लाख रुपयांनी श्रीमंत अधिक श्रीमंत झालेयत. तर त्यांच्या मालमत्तावाढीचा वेग सुपरसॉनिकपेक्षाही जास्त असा दिवसाला २२०० कोटी रुपयांचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विक्रमी वेगानं श्रीमंती वाढलेला हा वर्ग भारतातील एकूण लोकसंख्येच्या फक्त एक टक्का आहे. ((एकीकडे या एक टक्का वर्गाची मालमत्ता ३९ टक्के वाढली असताना गरीबांची मालमत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढू शकलीय. त्यामुळे स्वाभाविकच एक टक्के भारतीयांकडे देशातील अर्ध्याहून अधिक मालमत्ता आहे, तर त्याचवेळी तब्बल १३ कोटी ६० लाख भारतीय कर्जबाजारी असल्याचंही उघड झालंय. हा वर्ग आर्थिक दुर्बल वर्गातील आहे.))
Continues below advertisement