VIDEO | नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भीषण पाणीटंचाई, घोटभर पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार? | एबीपी माझा
Continues below advertisement
महाराष्ट्राला यंदा भीषण दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील बरड्याच्या वाडीचं वास्तव आम्ही तुम्हाला दाखवलं. तशीच काही स्थितीसुरगाणा तालुक्यातही आहे. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात सुरगाणा तालुक्यातील गळवड गावातील ग्रामस्थांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. दिवसभर पाणी भरण्यासाठी ज्यांचा नंबर लागत नाही त्यांना रात्रभर जागावे लागते, रात्री अपरात्री विहिरीच्या अवती भवती अर्ध्याहून अधिक गाव गोळा होतो. दरवर्षी दिवाळीनंतर अशीच परिस्थिती उद्भवते.
Continues below advertisement