वाशिम : एकतर्फी प्रेमातून 18 वर्षांच्या तरुणीला जिवंत जाळलं
Continues below advertisement
लग्नाला नकार दिला म्हणून १८ वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थरकाप उडवणारी ही घटना वाशिम जिल्ह्यातील सावळ गावातील आहे. याप्रकरणी आरोपी रवी भालेरावला पोलिसांनी अटक केली आहे.
रवी भालेराव हा गावात राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. १९ जूनला तरुणी घरात एकटी असताना रवीने तिला लग्नासाठी विचारणा केली. मात्र तरुणीने रवीला स्पष्ट शब्दात नकार दिला. तरुणीच्या नकाराने चिडलेल्या रवीने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं.
Continues below advertisement