वारी स्पेशल : पंढरपूर : एकाशीला प्रसादासाठी 70 महिला दिवसाला बनवतात 50 हजार लाडू
Continues below advertisement
आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूरमध्ये मंदिर प्रशासनाकडून तब्बल 10 लाख लाडूचा प्रसाद बनवण्यात येत आहे. मंदिर प्रशासनाने हे काम सुवर्णक्रांती महिला उद्योग समूहाकडे दिलं आहे. बचत गटाच्या 70 महिला रोज 50 हजार लाडू या वेगाने प्रसाद बनवत आहेत. रोज 15 ते 18 तास काम करुन बुंदीचे लाडू बनवण्याचे काम सुरु आहे.. कागदी पिशव्यांतून लाडूचा हा प्रसाद भाविकांना दिला जाणार आहे. शिवाय आषाढी एकादशीला हा बुंदीचा लाडू वारकरी खावू शकत नाहीत, म्हणून सांगलीहून राजगिऱ्याचे लाडूही मागवले आहेत.
Continues below advertisement