वर्धा : हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या इंजिनला आग, सहाय्यक मोटरमनचा मृत्यू

Continues below advertisement
वर्धा : हावडा येथून मुंबईला जाणाऱ्या 12810 या मेल एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागून सहाय्यक मोटरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगावसमोरील तळणी जवळ दुपारी साडे चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

अचानक इंजिनला आग लागताच मोटरमनने गाडी थांबवून इंजिनातून उडी घेतली. मात्र सहाय्यक मोटरमनचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल दोन तासांनंतर दुसरं इंजिन बोलावून रेल्वे मुंबईकडे रवाना करण्यात आली.

हावडा-मुंबई एक्स्प्रेस दोन तास उशिरा धावत असून अप-लाईनच्या गाड्या उशिरा धावत आहेत. या मार्गावरील अनेक गाड्यांना थांबवण्यात आलं आहे. पुलगाव येथील दोन अग्निशामक दल बोलावून आग विझवण्यात आली.

सहाय्यक मोटरमनचा मृतदेह पुलगाव येथे शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram