वर्धा : शिवसेना जिल्हाप्रमुखाने लाच मागितली, शिवसैनिकाचा आरोप
Continues below advertisement
वर्ध्याच्या शिवसेना जिल्हा प्रमुखानं शिवसैनिकाकडूनच 2 लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपानं खळबळ माजलीय. सागर जामखुटे यांना पत्नीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून मंत्र्यांचं पत्र हवं होतं. त्यासाठी त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली. मात्र देशमुखांनी ''समोरच्या व्यक्तीला २ लाख रुपये द्यावे लागतील'' असं सांगत २ लाख रुपये मागितल्याचा आरोप जामखुटे यांनी केलाय.
Continues below advertisement