वर्धा : वॉटरकप स्पर्धेला वर्धा जिल्ह्यातील गावांमध्ये उत्साहात सुरुवात
Continues below advertisement
वॉटर कप स्पर्धेत गेल्या वर्षी महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील काकडधारा गावाला मिळाला होता. त्यामुळे यंदाही वर्धा जिल्ह्यातून अनेक गावं स्पर्धेत सहभागी झाली आहेत. आर्वी तालुक्यातील परसोडी, टेंभरी आणि सेलु तालुक्यातील खढकामध्ये रात्री दीड वाजेपर्यंत ग्रामस्थांनी श्रमदान केलं. यात वैद्यकिय जनजागृती मंच, बहार नेचर फाऊंडेशन या संघटनांनीही सहभाग घेतला.
Continues below advertisement