EXCLUSIVE : वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल' मोर्चानिमित्त अजित पवार यांच्याशी बातचित
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल यात्रा सुरु केली. यवतमाळमधून सुरु झालेली ही यात्रा सोमवारी वर्ध्यात पोहचली. कर्जमाफी, हमीभाव, पोलिसांची नागरिकांना होत असलेली मारहाण, बिघडलेली कायदा सुव्यवस्था अशा अनेक मुद्यांवरून अजित पवारांनी सरकारवर टीका केली. सोबतच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यावरही महत्वाचं भाष्य केलं. अजित पवार यांच्याशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी केलेली ही एक्सक्ल्युझिव्ह बातचित.