नवी दिल्ली : न्यायमूर्तींच्या वादावर लवकरच तोडगा निघेल : अॅटर्नी जनरल

Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या विवादावर लवकरच मार्ग निघेल, असं अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी काल पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या कारभारावर बोट ठेवलं. न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायमूर्तींनी अशाप्रकारे पत्रकार परिषद घेतली. यानंतर संपूर्ण देशभरातून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, हे न्यायपालिकेचा अंतर्गत वाद असून, सरकार त्यात हस्तक्षेप करु शकत नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram