पंजाब : वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रिट परेडला अभिनेते नाना पाटेकर यांची हजेरी
अभिनेते नाना पाटेकर यांनी रिट्रीट परेडला हजेरी लावून जवानांचा उत्साह वाढवला. पंजाबच्या फिरोजपूर इथल्या हुसैनीवाला सीमेवर झालेल्या रिट्रिट परेडला नाना पाटेकर हजर होते. यावेळी जेव्हा रिट्रिट परेड सुरु झाली, तेव्हा नाना पाटेकर स्वतः जवानांमध्ये गेले आणि त्यांनी जवानांसह उपस्थितांचा उत्साह वाढवला.