मुंबई : वडाळ्याजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, मोनोरेल ठप्प
Continues below advertisement
आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास वडाळ्याजवळ म्हैसूर कॉलनी स्टेशन येथे मोनोरेलच्या मागच्या डब्यांना शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं ही मोनोरेल रिकामी असल्यानं मोठी दुर्घटना टळली.
आगीची माहिती मिळताच मोनोरेल प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आणि याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.
दरम्यान, या आगीत मोनोरेलच्या दोन डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. तसंच सध्या मोनोरेलची वाहतूकही ठप्प आहे. काही वेळात मोनोरेलची सेवा सुरु होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे.
Continues below advertisement