कौल कर्नाटकचा : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 222 जागांसाठी संध्याकाळी 5 पर्यंत 64 टक्के मतदान
Continues below advertisement
अख्ख्या भारताचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकासाठी आज मतदान पार पडलं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी आज मतदान झालं. यात एकूण 2 हजार 600 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. दरम्यान, सकाळी मतदान केल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी भाजपला 150 जागा मिळतील आणि 17 मे रोजी आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला आहे.
Continues below advertisement