बाप्पा माझा | मुंबई | विलेपार्लेतील पोलीस बाप्पा आकर्षणाचा केंद्रबिंदू
मुंबईतल्या विलेपार्लेमधला पोलीस बाप्पा सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरतोय.. मुंबई पोलिसात कार्यरत असणाऱ्या राजेंद्र काने यांनी खास पोलिस वेशातील हा बाप्पा आपल्या घरी विराजमान केला आहे. पोलीस रुपातील बाप्पाचं त्यांच्या घरातील हे दुसरं वर्ष आहे. प्रत्येक सण-उत्सवात नागरिकांच्या रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या पोलिसांना उदंड आयुष्य लाभू दे अशीच पोलीस बाप्पाला प्रार्थना...