Vivek Oberoi | चोराच्या उलट्या बोंबा, विवेक ओबेरॉयकडून 'त्या' ट्वीटचं समर्थन | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर भाष्य करताना ऐश्वर्या रायच्या फोटोचा केलेला वापर अभिनेता विवेक ओबेरॉयला महागात पडण्याची शक्यता आहे. जुनी प्रकरण उकरून काढत ऐश्वर्या रायच्या वैयक्तित आयुष्यावर टिप्पणी करणाऱ्या विवेक ओबेरॉयवर सिनेतारकांकडून जोरदार टीका होतेय.. उर्मिला मातोंडकर, सोनम कपूर यांनी ट्विट करून विवेकवर खरमरीत टीका केलीय. विवेकच्या ट्विटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून, त्याला नोटीसही बजावलीय. विवेकचं हे ट्विट महिलेला अनादर करणारं असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलंय. एक्झिट पोलवर बोलताना विवेकनं ऐश्वर्याचे सलमान खानसोबत, स्वत: सोबत आणि अभिषेक बच्चन सोबतचा फोटो ट्विट केलाय. आणि त्यावर ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निकाल असं लिहिलं आहे. या ट्विटमुळे विवेकवर सर्व स्तरातून टीका होताना पाहायला मिळतेय.
Continues below advertisement