ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार
Continues below advertisement
यंदाचा विष्णुदास भावे नाट्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.
येत्या 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25 हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकानं सन्मानित करण्यात येते. आजपर्यंत 51 दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बालगंधर्व, आचार्य अत्रे, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, जब्बार पटेल अशा दिग्गजांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
Continues below advertisement