विशाखापट्टणम : पोटातून 14 सोन्याच्या बिस्किटांची तस्करी, प्रवासी अटकेत
Continues below advertisement
विशाखापट्टणम विमानतळावर कस्टम विभागानं टाकलेल्या धाडीत सोनं तस्करी करणाऱ्याच्या पोटात तब्बल 14 सोन्याची बिस्किटं सापडली आहेत. रविवारी 54 वर्षीय रझाक श्रीलंकेवरून विशाखापट्टणम विमानतळावर दाखल झाला.
त्यानंतर त्याला केजीएच रूग्णालयात दाखल करण्यात आलं, रझाकवर झालेल्या शस्त्रक्रियेत त्याच्या पोटात 100 ते 150 ग्रॅमची 14 सोन्याची बिस्किटं आढळून आली. याआधीही रझाकनं अशाच प्रकारे सोन्याची तस्करी केल्याची कबुली स्वत: रझाकनंच दिली आहे.