नवी दिल्ली : आधार कार्डच्या धर्तीवर आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडी सुरु करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी 16 अंकांचं असेल.
आधार कार्डमधील माहिती चोरी होत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होते. त्यातच एका इंग्रजी वृत्तपत्राने असाही दावा केला होता की, काही रकमेच्या बदल्यात आधार कार्डवरील माहिती मिळवणं अगदी शक्य आहे. दुसरीकडे, आरबीआयशी संबंधित एका संस्थनेही दावा केला होता की, आधार कार्डवरील माहिती सायबर गुन्हेगारांना मोठी मदतीची ठरते आहे.
आधार कार्डमधील माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मात्र यूआयडीएआयने कायमच केला आहे. ती माहिती लीक होणं शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र तरीही खासगी सुरक्षेचं कारण पुढे करत यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे.