पालघर पोटनिवडणूक : योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे आमनेसामने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विरारमध्ये आले. 'सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय' असं म्हणत आदित्यनाथ यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर निशाणा साधला. तर त्याच वेळी वसईमध्ये प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनीही आदित्यनाथांना चोख प्रत्युत्तर दिलं.