विरार : लोकलमध्ये पुन्हा एकदा महिलांची गुंडगिरी, 3 महिलांची विद्यार्थिनीला मारहाण

Continues below advertisement

विरार ट्रेन आणि दादागिरी हे जणू समीकरणच बनलं आहे. ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या टोळक्याची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

सीटवर बसण्याच्या कारणावरुन तीन महिला प्रवाशांनी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला थापड बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सपना मिश्रा (वय 19 वर्ष) असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बोईसर इथल्या थीमस इंजिनीअर कॉलेजमध्ये शिकते.

नालासोपाराची असलेली सपना मिश्रा दररोज विरारहून बोईसर ट्रेनने प्रवास करते. बुधवारी सकाळी विरार रेल्वे स्थानकातून 7.55 ची इंटरसिटी एक्स्प्रेस पकडून ती आईसोबत बोईसरला जात होती. परंतु सीटवर बसल्याच्या कारणावरुन तिला तीन महिला प्रवाशांनी मारहाण केली.

या प्रकरणी सपनाने मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून चौकशी करुन महिलांविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram