वसई : विरारमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
Continues below advertisement
विरारमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. विरार पूर्वच्या चंदनसार परिसरातल्या घाणीचा तलाव भागात पाईपलाईन फुटल्यामुळे तब्बल २० फुट उंच पाण्याचे फवारे उडाले होते. सकाळी ७ वाजता फुटलेल्या पाईपलाईमधून रात्री १० पर्यंत पाण्याचे फवारे सुरुच होते. रात्री उशिरा महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी बंद केलं. गेल्या २० वर्षांपासून वसई विरार शहराला उसगाव धरणातून पाणीपुरवठा याच पाईलाईनच्या माध्यमातून केला जातो.
Continues below advertisement