विरार : अमित झा आत्महत्या : पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा
विरारमधील विकास आणि अमित झा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख सह तिघांवर आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पालघर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून विकास झा आणि अमित झा या दोघां भावांनी आत्महत्या केली होती. या दोघांनीही आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या अत्याचाराचा पाढा वाचला होता. मृताच्या नातेवाईकांनी गुन्हेगारांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.