विरार : एकाच पद्धतीने दोन महिलांची हत्या
विरार परिसरात मागच्या पाच दिवसात दोन महिलांची हत्या झाली आहे. विशेष म्हणजे या महिलांचे मृतदेह एकाच पद्धतीने जाळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. विरारजवळच्या कनेर भागातील जंगलात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला. या महिलेची आधी हत्या करुन नंतर ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचा संशय पोलिसांना आहे. रविवारी विरारमध्येच एका महिलेचा मृतदेह अशाच पद्धतीने जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद केली असून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पण अजूनही दोन्ही महिलांची ओळख पटली नाहीय. तसंच कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती लागले नाही.